image

नमस्कार,

महायोगी 'श्रीअरविंद' व दिव्यत्वाच्या प्रवासातील त्यांच्या सहयोगिनी 'श्रीमाताजी' यांनी भारतीय वेदपरंपरा, संस्कृती, संतपरंपरा, भारतीय तत्त्वज्ञान यापासून सुरुवात करून, त्याहीपलीकडे जाणाऱ्या विचारांची मांडणी केली आहे. अध्यात्मक्षेत्रातील अतिमानस योगाचे प्रणेते, पूर्णयोगाचे उद्गाते म्हणजे श्रीअरविंद. त्यांचे बहुतांशी सारे साहित्य मूळात इंग्रजी व बंगाली भाषेत आहे. तर श्रीमाताजी यांचे बहुतांशी वाङ्मय फ्रेंच व इंग्रजी भाषेत आहे.

हे दुर्मिळ विचारधन मराठीत आणण्याचे प्रयत्न ’अभीप्सा’च्या माध्यमातून अव्याहतपणे चालू आहेत. पाँडिचेरीहून प्रकाशित होणाऱ्या श्रीअरविंद सोसायटीच्या ‘ऑल इंडिया मॅगेझिन’वर आधारलेली मराठी आवृत्ती म्हणजे ‘अभीप्सा’. १९७५ पासून प्रकाशित होणारे हे मासिक.

वाचकहो, चाळीस वर्षांहून अधिक वर्षे सुरु असलेली ही अभीप्साची परंपरा अधिक समृद्ध करण्याचे कसोशीचे प्रयत्न श्रीअरविंद सोसायटीतर्फे संपादक-प्रकाशक यांनी सुरु केले आहेत. ह्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणजे 'अभीप्सा' चा ब्लॉगसुद्धा सुरु करीत आहोत.

जगभरात विखुरलेल्या मराठी वाचकांपर्यंत पोहोचण्याचा हा एक प्रयत्न आहे.

संपादक - 'अभीप्सा' मासिक

'अभीप्सा'मध्ये आजवर प्रकाशित झालेले काही विषय

* जगण्याचे विज्ञान
* श्रीअरविंद आश्रम
* मानवी मन व अहंकार
* दु:ख - कारण व उपाय
* विश्रांती व ताणमुक्ती
* आत्म-समर्पणाचे महत्त्व

* ब्रह्मचर्य
* चार तपस्या व चार मुक्ति
* कर्मयोगाचे रहस्य
* साधनेमध्ये मार्गदर्शन
* रोगांपासून मुक्ति
* मृत्युनंतरचे जीवन

* साधनेची तीन प्रमुख तत्त्वे : अभीप्सा, त्याग, समर्पण
* श्रीअरविंद व श्रीमाताजींनी साधकांना केलेले मार्गदर्शन
* खरे हिंदुत्व म्हणजे काय ? (भारतीय संस्कृती व धर्म)
* श्री अरविंदांच्या लिखाणातले स्वामी विवेकानंद व श्रीरामकृष्ण
* शारीर-भौतिक रूपांतरणाचा श्रीमाताजींचा योग (१९५८-१९७३)
* श्री अरविंदांची शिकवण, ती अनुसरण्याची पद्धत आणि तिचा आरंभ

अभीप्साची एक झलक

image
प्रसवपूर्व काळाबद्दलचे शिक्षण

जोवर स्त्रिया स्वत:ची मुक्तता करून घेत नाहीत तोवर कोणताही कायदा त्यांना मुक्त करू शकणार नाही. स्त्रियांना गुलाम बनविणार्‍या गोष्टी पुढीलप्रमाणे - १) पुरुष आणि त्यांच्या सामर्थ्याविषयीचे आकर्षण २) स्वत:चा संसार आणि त्याची सुरक्षा याविषयीची इच्छा ३) मातृत्वाविषयीची आसक्ती

जर स्त्रिया या तिन्ही गोष्टींच्या गुलामगिरीपासून मुक्त होतील तर त्या खर्‍या अर्थाने पुरुषांच्या बरोबरीच्या होतील.

पुरुष देखील पुढील तीन गोष्टींमुळे गुलाम होतात - १) स्वामित्वाची भावना आणि सत्ता व प्रभुत्व यांबद्दल आसक्ती २) स्त्रीबरोबरील लैंगिक नात्याची इच्छा ३) वैवाहिक जीवनातील छोट्या छोट्या सुखांविषयीची आसक्ती

जर पुरुष या तिन्ही गोष्टींच्या गुलामगिरीपासून मुक्त होतील तर ते खर्‍या अर्थाने स्त्रियांच्या बरोबरीचे होतील.

- श्रीमाताजी

भारतीय शाश्वत धर्म

मानवतेसाठी भारताच्या उभारणीमध्ये साहाय्यभूत होणे हे आमचे ध्येय आहे. हाच आमच्या राष्ट्रीयतेचा आत्मा असून, त्याला आम्ही मानतो आणि त्याचे अनुसरण करतो. आमचे मानवतेला असे सांगणे आहे की, आता अशी वेळ आली आहे की तुम्ही एक मोठे पाऊल उचलले पाहिजे आणि या भौतिक अस्तित्वातून वर उठून, ज्याकडे आता मानवता वळत आहे अशा अधिक उच्च, अधिक खोल व अधिक विशाल अशा जीवनाकडे वाटचाल केली पाहिजे. मानवजातीला भेडसावणार्‍या समस्या ह्या आंतरिक साम्राज्यावर विजय प्राप्त करून घेऊनच सोडविता येतील; केवळ निसर्गाच्या शक्ती आरामयदायक अशा सुखसोयींच्या सेवेत जुंपून ह्या समस्या सुटणार नाहीत; तर बाह्य प्रकृतीवर आंतरिक रितीने विजय मिळवीत, माणसाचे बाह्य व आंतरिक स्वातंत्र्य सिद्ध करत, बुद्धी व आत्म्याच्या शक्तींवर प्रभुत्व मिळवून ह्या समस्या सोडविता येतील.

- श्रीअरविंद

धर्म आणि अध्यात्म

बहुधा कोणतेही दोन मार्ग अगदी एकसारखेच असत नाहीत, प्रत्येकाने स्वत:चा मार्ग स्वत:च शोधावयास हवा. पण याचा अर्थ असा नव्हे की, तो मार्ग बुद्धीने शोधायचा, तो मार्ग अभीप्सेच्या आधारे शोधावयास हवा; मार्ग हा विश्लेषण आणि अभ्यास याद्वारे नव्हे तर अभीप्सेची तीव्रता आणि आंतरिक उन्मुखतेबद्दलची निष्ठा याच माध्यमातून शोधावयास हवा.

जेव्हा व्यक्ती खरोखर आणि पूर्णपणे त्या आध्यात्मिक सत्यालाच अभिमुख झालेली असते, बाकी सर्व गोष्टी तिच्या दृष्टीने गौण ठरतात, जेव्हा ते आध्यात्मिक सत्य तिच्या लेखी अपरिहार्य आणि अटळ गोष्ट बनते, तेव्हा त्याकडून उत्तर मिळण्यासाठी, त्याकडून प्रतिसाद मिळण्यासाठी तीव्र, संपूर्ण एकाग्रतेचा केवळ एक क्षणदेखील पुरे असतो.

- श्रीमाताजी

वर्गणी व जाहिरातीसंबंधी

वर्गणी व देणगी
वार्षिक वर्गणी : १८० रु.
तीन वर्ष : ५२० रु.
पाच वर्ष : ८६० रु.
*
देणग्या 80G अंतर्गत करसवलतीस पात्र.
बँकेचे तपशील
वर्गणी वा जाहिरातीची रक्कम
आपण Online भरू शकता.
बँकेचे नाव : स्टेट बँक ऑफ इंडिया,
अमरावती मेन ब्रँच.
IFSC Code : SBIN0000311
A/C No : 11092407563
जाहिरात दर
पाव पान जाहिरात
महिना : ५०० रु. वार्षिक : ५००० रु.
अर्धा पान जाहिरात
महिना : १००० रु. वार्षिक : १०००० रु.
पूर्ण पान जाहिरात
महिना : १५०० रु. वार्षिक : १५००० रु.
'अभीप्सा'च्या निवडक अंकांमधील काही मजकूर

श्रीअरविंद व श्रीमाताजी यांची ध्येयधोरणे, पूर्णयोगाची त्यांची पद्धत सदस्यांना व एकंदरच सर्वांना ज्ञात व्हावीत, व ती उद्दिष्टे प्रत्यक्षात उतरवण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न करावेत आणि श्रीअरविंद यांनी पाहिलेले आध्यात्मिक समाजाचे स्वप्न साकार करावे या भूमिकेतून श्रीमाताजींनी १९६० साली 'श्रीअरविंद सोसायटी'ची स्थापना केली. 'श्रीअरविंद सोसायटी' वैयक्तिक पूर्णत्व, सामाजिक रूपांतरण, आणि विविधतेमध्ये एकता यासाठी कार्यरत आहे. उद्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ज्यांना ज्यांना कार्य करण्याची इच्छा आहे त्या सर्वांना सोसायटी आवाहन करीत आहे.

प्रकाशक - श्री. गोविंद पोतदार
संपादक - डॉ. केतकी मोडक

Contact Form

Name

Email *

Message *